जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवाजी नगरातील क्रांती चौकातील इलेक्ट्रिक पोल जीर्ण झाला असून ते तातडीने काढण्यात यावे अशी मागणीचे निवेदन नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी अयोध्या नगरातील महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवाजी नगर परिसरातील क्रांती चौकात गेल्या २० ते ३० वर्षांपासून ईलेक्ट्रीकचे दोन गोल पोल पुर्णपणे जीर्ण खराब झाले आहे. या दोन पैकी एक पोल हा यापुर्वीच पडला आहे. तर दुसरा पोल देखील पडण्याच्या मार्गावर आहे. या रस्त्यावरून मजूरांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे हा पोल अचानक पडल्याने एकाद्याचा अपघाती मृत्यू होवू शकतो. कोणतीही अनुचित प्रकार होण्यापुर्वीच तातडीने हा जीर्ण झालेला ईजेक्ट्रिक पोल काढून नवीन पोल बसविण्यात यावी. यापुर्वी या पोल काढण्यासंदर्भात महावितरण कार्यालयात वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहे. परंतू याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तातडीने यावर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदनात नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी म्हटले आहे.