जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील एका भागात राहणारी २८ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १५ मे रोजी आजाद नगरातील कब्रस्थान जवळून सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पायी जात असतांना आशिफ उर्फ गंधा फैजल याने महिलेचा पाठलाग करून तिचा हात पकडला. तु मेरी है मेरी ही रहेगी असे म्हणून तिचा विनयभंग केला. तसेच तु मुझे नकार देगी तो मै तेरी लडकी, को ओर तेरे घरवालोंको नही छोडुंगा अशी धमकी दिली. अखेर महिलेने थेट रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी आशिफ फैजल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.



