Home क्राईम वाघूर धरणावरून शेतकऱ्यांच्या सात पाणबुडी मोटारी लांबविल्या

वाघूर धरणावरून शेतकऱ्यांच्या सात पाणबुडी मोटारी लांबविल्या


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या वाघुर धरणावरील शेतकऱ्यांच्या ७ पाणबुडी मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत राजेंद्र पाटील रा. कंडारी ता. भुसावळ जि.जळगाव यांचे वाघूर धरणाजवळ शेत आहे. शेतात पाणी नेण्यासाठी त्यांनी धरणावर पाणबुडी लावलेल्या आहे. १२ मे रोजी सायंकाळी ५ ते १३ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान धरणावर लावलेले एकुण ७ पाण्याच्या पानबुडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधीर विसपुते करीत आहे.


Protected Content

Play sound