पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा तालुका शिक्षण संस्था संचलित शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाची विद्यार्थिनी युगंधरा पाटील हिने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून इंग्रजी विषयात सुवर्णपदक पटकावले आहे.
तिच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी विशेष संदेशाद्वारे अभिनंदन केले आहे. तसेच पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मा. आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हा. चेअरमन विलास जोशी, मानद सचिव ॲड. महेश देशमुख, एम. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.