Home Cities एरंडोल सुसाईड नोट लिहून महिलेची आत्महत्या

सुसाईड नोट लिहून महिलेची आत्महत्या

0
109

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिलेने सुसाईड नोट लिहून गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना एरंडोल शहरात घडली आहे. याबाबत पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार, रूपाली विश्वनाथ पाटील रा. एरंडोल जि.जळगाव ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता रूपाली पाटील या महिलेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी महिलेने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, “एका अज्ञात व्यक्तीने केलेली बदनामी मी सहन करू शकले नाही” असे नमूद केलेले आढळून आले आहे. सुसाईड नोट एरंडोल पोलीसांनी जप्त केली आहे. महिलेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अज्ञात व्यक्तीविरोधात श्रीराम पाटील यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोन गणेश अहिरे करीत आहे.

 


Protected Content

Play sound