Home क्राईम सुरक्षा दलांच्या कारवाईत लष्कर-ए-तोयबा दोन दहशतवादी ठार

सुरक्षा दलांच्या कारवाईत लष्कर-ए-तोयबा दोन दहशतवादी ठार

0
125

जम्मू-काश्मीर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । येथे दहशतवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू असून यात कुलगाम भागात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

“एका गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर परिसराला वेढा घालून सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांना ठार केले आहे.  शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार सुरू केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. काही तास चाललेल्या या चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.” यात पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा कमांडर हैदर हैदरचा खात्मा हे सुरक्षा दलाचे मोठे यश मानले जात आहे. या चकमकीत ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव शाहबाज शाह असल्याचे सांगण्यात आले आहे. जो काश्मीरचा रहिवासी होता. तत्पूर्वी कुलगाममध्येच काही दिवसांपूर्वी सतीश कुमार सिंग या नागरिकाची हत्या झाली होती. दहशतवाद्यांकडून एक AK-47, एक पिस्तूल, अनेक ग्रेनेड सापडले आहेत.


Protected Content

Play sound