भुसावळ येथे निकृष्ट शालेय पोषण आहार वाटप – वंचित बहुजन आघाडीची तक्रार

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात शालेय पोषण आहार वाटपामध्ये मोठा भ्रष्टाचार होतांना दिसत असून संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप भुसावळ शहरामध्ये विद्यार्थ्यांना होत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

अधिकारी व कंत्राटदार संगनमताने भ्रष्टाचाराचा कारभार होतांना दिसत असल्याचे सांगत यासंबंधीत तक्रार वंचित बहुजन आघाडीने शिक्षण विस्तार अधिकारी वायकोळे व प्रधान यांना सोबत घेऊन जात तु. स. झोपे शाळेमधील प्रकार उघडकीस आणला. हा प्रकार उघडकीस आणला आहे. जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे यांनी गट विस्तार शिक्षण अधिकारी वायकोळे व प्रधान यांना यासंदर्भात तक्रार दिली.

मुख्याध्यापक यांच्या समक्ष वाटप होत असलेल्या धान्य गोडाऊनला सिल करण्यात आले. संबंधित अधिकार्‍यांवर व कंत्राटदार यांच्यावर कडक कारवाई करावी अशी वंचित बहुजन आघाडीने मागणी केली आहे.

याप्रसंगी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, भुसावळ तालुका सचिव गणेश इंगळे, भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे, शिवाजीराव टेंभुर्णीकर, बंटी सोनवणे यासह विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. वरिष्ठांनी याची तात्काळ दखल न घेतल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. असे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

 

Protected Content