डॉ.गीतांजली ठाकूर यांची कोरोना ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती

 

एरंडोल, प्रतिनिधी : येथील सुखकर्ता फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.गीतांजली ठाकूर यांची एरंडोल नगरपालीकेमार्फत कोरोना विरोधी लढ्यासाठी कोरोना ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ति करण्यात आली आहे.

सुखकर्ता फाऊंडेशन मार्फत एरंडोल शहरात आरोग्यविषयक विविध उपक्रम राबविले जातात. फाऊंडेशन मार्फत ग्रामीण भागात जनजागृती ,आरोग्य यंत्रणेशी व न.पा.प्रशासनाशी सुसंवाद साधुन सार्वजनिक स्वच्छता, न.पा.मार्फत निर्जुन्तीकरण, फवारणी,रुग्णाची आरोग्य चाचणी ,अती जोखमीचे कार्य करणार्या न.पा.कर्मचारी वर्गाला सरंक्षक साहित्याचे वाटप ,पीपीइ किट वापराबाबत मार्गदर्शन. जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत सुचना ह्याविषयी कार्य करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे एरंडोल शहरात सामाजीक संदेश माध्यमाद्वारे प्रभावी जनजागृती ,विविध वृत्तपत्रीय कोरोना विषयी लेख असे योगदान आजपर्यंत दिले आहे. .सुखकर्ता फाऊंडेशन मार्फत एरंडोल शहरातील अल्पउत्पन्न असलेल्या कूटुंबातील एक हजार नागरिकापर्यंत प्रत्येकी एक किलो तांदूळचे वाटप स्वखर्चाने करण्यात आले आहे . शहरातील व्यापारी वर्गासाठी १०० फेसशील्ड चे वाटप करण्यात आले आहे. कोरोनाविरोधी लढ्यासाठी डॉ.गीतांजली ठाकूर व त्यांच्या सुखकर्ता फाऊंडेशन ने केलेल्या धडपडीची दखल घेऊन एरंडोल नगरपालिकेचे लोकनियूक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी विशेष पत्रकाद्वारे ही नियुक्ति केली आहे. डॉ.गीतांजली ठाकूर यांच्याकडुन आगामी काळात असेच भरीव सहकार्य व मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा न.पा .मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे. डॉ.गीतांजली ठाकुरयांनी या नियुक्तिबद्द्ल नगराध्यक्ष व न.पा.प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे व या भयंकर अश्या कोरोनाच्या लढ्यात लोकसहभागाची गरज आवश्यक असल्याने सुखकर्ता फाऊंडेशन सारख्या इतर संस्थांनी यथाशक्ती असे योगदान द्यावे असे आवाहन केले आहे.

Protected Content