Home धर्म-समाज पाचोरा येथे श्री.रामदेव बाबा “जम्मा जागरण उत्साहात संपन्न

पाचोरा येथे श्री.रामदेव बाबा “जम्मा जागरण उत्साहात संपन्न

0
105

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भडगाव रोडावरील शक्तीधाम येथे श्री बाबा रामदेव “जम्मा जागरण” कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

स्व. ओमप्रकाश मोर व स्व. अमरावतीबाई मोर यांच्या स्मरणार्थ मोर परिवाराच्या वतीने उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री बाबा रामदेव जन्मवृतांत कथाचे वाचन हैदराबाद येथील प्रसिध्द गायक सुशील बजाज यांच्या मधुर वाणीमध्ये वाचण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात श्री बाबा रामदेव यांच्या आरतीने करण्यात आली. यावेळी श्री बाबा रामदेव  यांच्या जीवनातील विविध सजीव देखावे करण्यात आले होते. या देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. श्री रामदेव बाबा यांच्या जयघोषाने कथा मंडप दणाणून गेले होते. सोबतच श्री रामदेव बाबा यांची जोत अविरत ठेवण्यात आली होती. यावेळी श्री बाबा रामदेव यांच्या कथा मध्ये बाबांची तीन वेळा आरती करण्यात आली. त्यानंतर १ हजार लोकांचे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जळगांव, धुळे, सिल्लोड, खेतीया (मध्यप्रदेश), येथून भक्तगणांनी हजरी लावली. कार्यक्रमाचे आयोजन शांतीलाल मोर, राजेश मोर, गिरीश मोर, आशिष मोर, सह समस्त मोर परिवाराच्या वतीने करण्यात आले. यावेळी रमेश मोर, सिताराम अग्रवाल, अंकीत अग्रवाल, मोहन अग्रवाल सह समस्त अग्रवाल समाज (पाचोरा) व अग्रवाल नवयुवक मंडळ यांचे सहकार्य लाभले.


Protected Content

Play sound