Home Cities जळगाव डोमगाव विकासोवर परिवर्तन पॅनलचे वर्चस्व !

डोमगाव विकासोवर परिवर्तन पॅनलचे वर्चस्व !


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्‍यातील डोमगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या झालेल्या निवडणूकीत १३ जागांवर परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले आहे. नवनिर्वाचित संचालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

जळगाव तालुक्यातील डोमगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या १३ जागासाठी  निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीच्या रिंगणात सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनलचे उमेदवार यांच्या लढत झाली. या निवडणूकीत परिवर्तन पॅनलचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार निवडून येवून एक हाती सत्ता आली आहे.

 

या निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये बापू ओंकार वाघ, हिंमत पाटील, युवराज महाले, अशोक सुरवाडे, देवराम पाटील, वसंत लोहार, मिनाबाई महाले, युवराज पाटील, संदीप पाटील, विश्‍वनाथ जाधव, रमेश वाघ, लहू  पाटील आणि सुमनबाई न्हावी असे परिवर्तन पॅनलचे १३ उमेदवार निवडून आले आहे. निवडणूक यशस्वीतेसाठी  राजाराम महाले, अरुण जाधव, संदीप महाले, मनोज लोहार, एकनाथ महाले, अमृत वाघ, प्रकाश वाघ, गोपाल बोरसे, गणेश पाटील, दीपक बोरसे, दीपक पाटील, रवींद्र सुरवाडे, अनिल महाले, चंद्रभान पाटील, शरद महाले, अरुण पाटील या पदाधिकाऱ्यांनी यांनी परिश्रम घेतले.

 


Protected Content

Play sound