भादली बु. विकासोवर शिवसेनेचा झेंडा !

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील भादली बुद्रुक येथे विविध कार्यकारी सोसायटीवर शिवसेनेचा भगवा फडकाविला आहे. दरम्यान, नवनिर्वाचीत संचालकांनी आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी त्यांचे स्वागत केले व शेतकरी व सोसायटीस विकास कामांकरिता सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

 

भादली बुद्रुक येथे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत १३ पैकी ९ शिवसेनेसह महाराष्ट्र विकास आघाडीचे संचालक विजयी झाले. या माध्यमातून विकासोवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. भादली बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीमध्ये शिवसेना प्रणीत मविआ पॅनलने बहुमत मिळविले आहे. या निवडणुकीत मनोहर महाजन, जितेंद्र नारखेडे, हर्षल नारखेडे, राजेंद्र अत्तरदे, संदिप कोळी, अनिल नारखेडे, प्रकाश धनगर, विद्या सोपान कोल्हे व हेमलता प्रकाश नारखेडे हे संचालक म्हणून निवडून आले. विजयी उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तर दगडू चौधरी, पुरुषोत्तम पाटील, आबा कोळी, छगन खडसे, सलिम पिंजारी, नजीर पटेल, हेमंत कोल्हे, डिगंबर रडे, दिलीप रडे, राजु ढाके आदींनी सहकार्य केले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. के. विरकर व सहाय्यक म्हणून विकासो सचिव गुणवंत पाटील यांनी काम पाहिले. याप्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख छगन खडसे, विभागप्रमुख आबा कोळी व गण प्रमुख भुषण पाटील. ग्रा .पं. सदस्य छोटु पाटील व शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content