*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने दोन दिवसीय अभ्यास दौरा केला. यावेळी ग्रामपंचायतीने पाटोदा, हिवरेबाजार व राळेगण सिद्धी आदी ग्रामपंचायतीना भेटी देऊन त्याठिकाणच्या कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली.
चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून २२ व २३ एप्रिल असे दोन दिवसीय अभ्यास दौरा केला. असे दौरा करणाऱ्या त्या तालुक्यातील पहिल्या ग्रामपंचायत ठरल्या आहेत. यावेळी चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने पाटोदा, हिवरेबाजार व राळेगण सिद्धी अशा विविध ग्रामपंचायतीना भेटी दिल्या. व वरील ग्रामपंचायतीच्या कामकाजाविषयी इत्यंभूत माहिती जाणून घेतली. सुरूवातीला पाटोदा ग्रामपंचायतीला भेटी देऊन पाहणी केली. त्यावेळी ग्रामस्थांना दिल्या जाणाऱ्या प्राथमिक सोईसुविधा विषयी लोकनियुक्त सरपंच अनिता राठोड यांनी माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून माहिती दिली. त्यानंतर चैतन्य तांडाने ग्रामविकासाची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या हिवरेबाजार ग्रामपंचायत गाठून राज्यस्तरीय सरपंच परिषदेत आपला सहभाग नोंदविला. व जल साक्षरता केंद्राला भेट दिले असता अशाच प्रकारचा प्रकल्प चैतन्य तांड्यात उभारण्याचे संकल्प सरपंच अनिता राठोड यांनी पद्मश्री प्राप्त पोपटराव पवार यांच्या संवाद साधताना केली. तसेच जलसंधारण विषयी पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करण्याबाबत मार्गदर्शन राळेगणसिद्धीत समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. त्याचबरोबर यावेळी नापास विद्यार्थ्यांना शिकविणारी अण्णा हजारे यांच्या संस्थेलाही भेट देण्यात आली. यामुळे सदर दौरा खूप महत्वपूर्ण असल्याचे सांगितले जात असून बाकीच्या ग्रामपंचायतीने अशा प्रकारे दौरा करण्याचा आवाहन लोकनियुक्त सरपंच अनिता राठोड यांनी केले आहे.
यावेळी ग्रामसेवक कैलास जाधव, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, माजी चेअरमन दिनकर राठोड, सदस्या अनिता चव्हाण, गिता राठोड, यशोदा चव्हाण, सदस्य प्रविण चव्हाण, ग्रामस्थ उदल पवार, भाऊलाल चव्हाण, राजेंद्र चव्हाण, गोरख गोफणे आदी दौऱ्यात सहभागी होते.