विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

चाळीसगाव, प्रतिनिधी  । शहरात २५ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरात लोखंडी गजाला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरातील जय बाबाजी चौक येथे घडली असून याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, राकेश उर्फ भैय्या केशव चौधरी (वय- ३० रा. जय बाबाजी चौक ता. चाळीसगाव) येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास असून भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवित आहेत. मात्र शनिवार, २९ रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास घरातील सर्व सदस्यांचे जेवण झाल्याने पत्नी आरती हि एकटीच घरात झोपायला गेली. रविवारच्या सकाळी ६:३० पती राकेश उर्फ भैय्या केशव चौधरी याने घरात जाण्यासाठी दरवाजा ठोकून आवाज दिला असता तिने दरवाजा उघडला नाही. म्हणून शेजारील सुरेश सोनार यांना बोलावून आतून  लावलेला दरवाजा हा रॉडने तोडण्यात आले. परंतु घरात शिरकाव करताच पत्नी आरती हिने किचनमध्ये लोखंडी गजाला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याच्या अवस्थेत आढळून आले. हि घटना २९ रोजी रात्री ९:३० ते ३० रोजी सकाळी ६:३० दरम्यान घडली असून याबाबत पती राकेश उर्फ भैय्या केशव चौधरी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास स.पो.नि विशाल टकले हे करीत आहेत.

Protected Content