आम आदमी पार्टीची गांधीगिरी :श्रमदान मोहीम राबवून केला मनपाचा निषेध (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील काशिनाथ हॉटेलच्या बाजूच्या महानगरपालिकेच्या ह्द्द्तील रस्त्यावर औरंगाबाद हायवेचे वेस्ट मॅटीरायल टाकून रहादारी करता रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील याची दखल घेण्यात येत नसल्याने आम आदमी पार्टीतर्फे श्रमदान मोहीम राबवून मनपाच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यात आला.

 

मागील एक महिन्यापासून काशिनाथ हॉटेल जवळील राका फर्निचर रस्त्यावर औरंगाबाद राष्ट्रीय हायवेच्या वेस्ट मटेरियल मनपा हद्दीतील रस्त्यावर टाकून रस्ता राहादारीकरिता पूर्णतः बंद केला आहे. याबाबत जळगाव शहर आम आदमी पार्टीतर्फे शहर अभियंता व्ही. ओ.सोनावणी यांना कळविण्यात आले. त्यांनी दोन दिवसात ठेकेदारावर दांडात्मक कारवाई करून रस्ता मोकळा करतो अस आश्वसन दिल होते. तसेच वेळोवेळी जळगाव शहर आम आदमी पार्टीचे महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना भेटून लेखी तक्रार दिली. त्या आधीपण तक्रार दिलेली आहे. मात्र अद्याप रस्त्यावर मलबा आहे त्या अवस्थेत आहे. आज रविवार दि. २४ एप्रिल रोजी जळगाव शहर आम आदमी पार्टीच्या च्या कार्यकर्ते यांनी श्रमदान करून मनापाच्या नाकर्तेपणाचा निषेध केला.
जळगावकरांच्या आरोग्याचा विचार मनापा कर्मचारी, अधिकारी, सत्ताधारी कोणीही करण्यास नसल्याने जळगाव शहर आम आदमी पार्टी संविधानिक मार्गातून झोपलेल्या मनापाला जाग करून जळगांकरांचे मूलभूत प्रश्न पूर्ण ताकतीने सोडवू असे मत महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर व महानगर मीडिया प्रमुख योगेश भोई यांनी मांडले. पवन खांबयात व हेमराज सोनावणे यांनी नियोजन केले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते अनिल वाघ, तुकाराम चौधरी , सुभाष कोळी, माधवराव जाधव, प्रवीण चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1370269143779641

 

Protected Content