अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; एकावर गुन्हा दाखल

एरंडोल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या एका संशयितावर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

याबाबत माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. पिडीत मुलीचे वडील शेती काम करून उदरनिर्वाह करतात. १९ एप्रिल रोजी रात्री सर्वजण जेवून करून झोपले होते. दरम्यान, मुकेश रविंद्र कोळी या तरूणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना २० एप्रिल रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा परिसरात शोधाशोध केली परंतू ती कोठेही आढळून आली नाही. अखेर पिडीत मुलीच्या वडीलांनी यांनी कासोदा पोलीस ठाण्यात धाव घेवू तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून कासोदा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मुकेश कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शिवाजी पाटील करीत आहे.

 

Protected Content