Online fraud : क्रेडीटकार्ड धारकाची १५ हजाराची ऑनलाईन फसवणूक

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ! खासगी व्यवसाय करणाऱ्या तरूणाला क्रेडीट कार्डची मर्यादा वाढवून देण्याच्या नावाखाली ओटीपी विचारून १५ हजाराची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, अमळनेर शहरातील इस्लामपूरा भागात राहणारा शेख मोहम्मंद जुनेद (वय-२९) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. १९ एप्रिल रोजी सायंकाळी त्याला ०८८८१०२९१९२ क्रमांकावरून फ्रॉड कॉल आला. समोरील व्यक्ती रोहित सिंग बोलत असल्याची बतावणी करून आपण आयसीआयसीआय बँकेतील कर्मचारी असल्याचे सांगितले. तुमचे क्रेडीट कार्डचे ९० हजाराहून १ लाख ६५ हजार रूपयांचे लिमीट वाढविण्याचे असल्याचे कंपनीने ठरविले आहे. असे सांगून तुम्हाला आलेला ओटीपी गोड बोलून विचारून घेतला. दरम्यान, काही कळण्याच्या आत त्यांच्या क्रेडीट कार्डच्या माधमातून ५ हजाराचे तिन व्यवहार करण्यात येवून १५ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर शेख मोहमंद यांनी तातडीने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांया तक्रारीवरून २३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहे.

 

Protected Content