जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शेतकरी विविध समस्यांना तोंड देत असून आर्थिक संकटात सापडत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे. यासाठी शासनाने कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आ.गिरीश महाजन यांनी केले. ते जामनेर येथिल कार्यक्रमात बोलत होते.
जामनेर तहसील कार्यालयामध्ये शासनातर्फे तालुक्यातील सहा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपये मदतीचा धनादेश आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी तहसीलदार अरुण शेवाळे नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर नगरपालिका उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील नगरसेवक महेंद्र बाविस्कर आदी उपस्थित होते. तालुक्यातील सहा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत धनादेश देण्यात आला. त्यामध्ये ज्योतीबाई संजय राजपूत (रा. शहापूर), शोभाबाई सदाशिव झुंदल (रा. सामरोद), मिराबाई आसाराम जोशी (रा. कुंभारी), गजानन यशवंत कोळी (रा. बोरगाव), वैशाली विकास नापते (रा. खांडवे), पूजा गजानन उगले (रा. बेटावद) यांना धनादेश वाटप करण्यात आला.
कार्यक्रमात आमदार गिरीश महाजन पुढे बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांना दिवसेंदिवस शेती परवडत नाही कारण मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो मात्र आसमानी व सुलतानी संकटांमुळे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी तर कधी शासनस्तरावर त्यांना वीज दिली जात नाही त्यामुळे त्यांच्या हातातोंडाशी आलेला पीक वाया जातं लावलेला खर्च जाता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो परिणामी त्यांच्याकडे कोणताही पर्याय राहत नसून मंग आपले आत्महत्या करतात त्यानंतर त्यांना शासनस्तरावर मदत दिली जाते त्यापेक्षा शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही यासाठी आधीच उपाययोजना केल्या पाहिजे त्याचबरोबर त्यांना वेळोवेळी शेतीच्या सिंचनासाठी वेळेवर वीज पुरवठा केला पाहिजे पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांची पिके वाया जाणार नाही व तो आर्थिक संपन्न सापडणार नाही जर त्याला आर्थिक संकट आले नाही तर तो कर्जबाजारी होणार नसून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील अशी प्रतिक्रिया कार्यक्रमात बोलताना आमदार गिरीश महाजन यांनी दिली कार्यक्रमात सूत्रसंचालन प्रशांत निंबाळकर यांनी केले.