
भुसावळ, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ; दत्तात्रय गुरव – राज्यात मशिदीवरील भोग्यासंदर्भात भुसावळ बैठक झाली यात येथे शनिवार पासून भोंगा विरहीत अजान होणार असल्याची माहिती भुसावळ डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

आज भुसावळ शहरातील खडका रोड इदगाह परिसरात मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक, मौलवी, मस्जिद चे ट्रस्टी, पदाधिकारी, समाज बांधव आणि भुसावळ पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
या बैठकीत मौलवी, समाज बांधव यांच्या विचारविनिमय करून शनिवारपासून मशिदीमध्ये होणारी अजान भोंगा विरहीत करण्याचे संमतीनुसार मान्य करण्यात आले. यात सुप्रीम कोर्टाच्या २००५ चे निर्देशाचे अधीन राहून माईक, किंवा लाऊड स्पीकर शिवाय अजान करण्यात येईल अशी सर्वांनी ग्वाही समाजबांधवांतर्फे देण्यात आली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/390711112903121


