पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य तपासणी मेळावा उत्साहात

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारत सरकार अंतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान व महाराष्ट्र शासन अंतर्गत आरोग्य विभागातर्फे पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दि. २१ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी दोन वाजेपर्यंत भव्य अशा मोफत आरोग्य तपासणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पाचोरा तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिनेश सोनार, उपाध्यक्ष डॉ. अतुल पाटील, शल्य चिकित्सक डॉ. गगन साबु, स्त्री रोग तज्ञ डॉ. विजय पाटील, बालरोग तज्ज्ञ डॉ. राहुल पटवारी, हृदयरोग तज्ञ डॉ. अंकुश झंवर, दंतरोग तज्ञ डॉ. संपदा बोराडे, राष्ट्रीय किशोरी स्वास्थ अभियानाचे डॉ. संदिप पाटील, प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या मिरा दिदी, नंदा दिदी ह्या होत्या.

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आयोजित आरोग्य मेळाव्यात विविध आरोग्य समस्यांसंदर्भात २० कक्ष स्थापन करण्यात आले होते. यात स्री रोग विभाग, बालरोग विभाग, नाक – कान – घसा विभाग, नेत्ररोग विभाग, दंतरोग विभाग, जनरल तपासणी विभाग, रक्त तपासणी विभाग, सिकलसेल तपासणी विभाग, औषधी वाटप विभाग, केस पेपर विभाग, आयुष्यभरात विभाग, हेल्थ आय. डी. विभाग, मैत्री क्लिनिक विभाग, समुपदेशन विभाग, कोविड लसीकरण विभाग, क्ष – किरण विभाग व टि. बी. तथा कुष्ठरोग विभाग अशा २० कक्षांची स्थापना करण्यात आली होती. प्रत्येक कक्षावर त्या – त्या आजारांचे तज्ञ डॉक्टर्स व त्यांचे सहकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी करुन आवश्यक त्या सुचना व आजारासंबंधित मोफत औषधी देण्यात आली. मेळाव्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. एकनाथ राठोड, राष्ट्रीय किशोरी स्वास्थ अभियानाचे डॉ. संदिप पाटील, इंडियन रेडक्राॅस सोसायटीचे डॉ. एस. एस. सोनवणे, डॉ. पंकज नानकर, डॉ. इम्रोद्दिन शेख, डॉ. अनुपमा भावसार, डॉ. व्यंकटेश सोनवणे, डॉ. शितल वाघ, डॉ. वैशाली सिनकर, डॉ. अभिषेक जगताप यांनीही रुग्णांची तपासणी केली. मेळाव्यात जास्तीत जास्त रुग्णांना जनजागृती करुन सहभाग नोंदविण्यासाठी तालुका आशा स्वयंसेविका हर्षदा वाणी (लोहटार), मिनाक्षी पाटील (लोहटार), प्रतिक्षा क्षीरसागर (वरखेडी), शोभा पाटील (वरखेडी), सुनिता मोरे (वरखेडी), योगिता वाणी (नांद्रा), संगिता परदेशी (नांद्रा), रुपाली पाटील (नगरदेवळा), चित्रा तायडे (नगरदेवळा) तर पाचोरा येथील आशा स्वयंसेविका माधुरी राजेंद्र चव्हाण, अनिता पाटील, रंजना मोरे, पुनम कच्छवे, प्रतिभा रतन पाटील, प्रतिभा शशिकांत पाटील, वृषाली येवले, उज्वला साबळे, लिना पाटील, सुलताना तडवी, वैशाली महाजन, मनिषा अहिरे यांनी परिश्रम घेतले. सदरहु आरोग्य मेळावा यशस्वीतेसाठी मनोज पाटील, बबलु मराठे, नितीन कुलकर्णी, गजानन काकडे, माया धनगर, शैलेश बागुल, सह ग्रामीण रुग्णालयाचे परिचारक व परिचारिका यांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content