फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पालिकेच्या आरोग्य विभागात १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत शौचालय देखभालासाठी खरेदी करण्यात आलेल्या साहित्य खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गोलमाल झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपासून चर्चेत असलेल्या याविषयी माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी या साहित्य खरेदीत गैरप्रकार झाल्याची लेखी तक्रार केल्यानंतर मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्यावर पत्रकारांना साहित्य दाखवण्याची वेळ आली आहे.
ही खरेदी तब्बल ५ लाख ६५ हजार १५० रुपयाची असून मजेशीर बाब म्हणजे साहित्य पुरवठा करणारी संस्थाही आरोग्य निरीक्षकाच्या भावाचीच आहे व या खरेदीची प्रक्रिया सुद्धा केवळ आठ दिवसात पूर्ण करण्यात आल्याने प्रशासकीय राजवटीतील या खरेदीबाबत शंका व्यक्त होत आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून १५ व्या वित्त आयोग अंतर्गत शौचालय देखभाल (टॉयलेट मेंटेनन्स) साठी ५ लाख ६५ हजार १५० रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले. या साहित्य खरेदीसाठी दि.१० फेब्रुवारी रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती इतर साहित्य पुरवण्यासाठी मेहतर वाल्मीक जनकल्याण सेवा संस्था यांनी ही निविदा भरली होती व त्यांची निविदा मंजूर सुद्धा झाली होती
दरम्यान दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पुरवठादार संस्था व पालिका यांच्या दर कमी करण्यासंदर्भात वाटाघाटी होऊन ४ मार्च रोजी संबंधित संस्थेला मंजुरीचे पत्र व कार्यादेश देण्यात आले होते त्यानंतर संस्थेने साहित्य पुरवठा करून ८ मार्च रोजी केले ते दाखवण्याचा आले आहे त्यानंतर आरोग्य विभागाने तात्काळ व्हाउचर बिल तयार करुन लेखापाल यांच्याकडे सादर केले तर ९ मार्च रोजी पुरवठादार संस्थेने बिल मिळण्याची मागणी देखील केल्याचे पत्र आहे.
त्यामुळे तात्काळ दि.१० मार्च रोजी या पुरवठा संस्थेला ५ लाख ६५ हजार १५० रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे. सर्वात मजेशीर बाब म्हणजे पुरवठादार संस्थेने त्यासाठी पाच बिले सादर केले असून या पाचही बिलांवर तारखा, सह्या, बिल कोणाच्या नावे सादर केले याचा साधा उल्लेखही नाही तर वाटाघाटी होऊन सुद्धा साहित्य खरेदी अव्वाच्या सव्वा दराने खरेदी केल्याचे बिलांवरून दिसते
त्यावरही कडी म्हणजे साहित्य पुरवठा करणारी संस्थाही आरोग्य निरीक्षकाच्या भावाचीच असल्याने या साहित्य खरेदीत गोलमाल असल्याची शंका व्यक्त होत आहे सदरचे बिले हे आरोग्य विभागामार्फत तयार होऊन ते लेखापाल त्यानंतर मुख्याधिकारी व पुन्हा लेखापाल यांच्याकडे तपासण्यासाठी जात असतात असा प्रवास करून सदरची बिले सादर होत असताना एकानेही काळजीने ते तपासावे नाही याचे नवल वाटत आहे बिलांची बेरीज व प्रत्यक्ष अदा करण्यात आलेली रक्कम यात जवळपास 36 हजार 500 रुपयांची तफावत असल्याचे ही अनेकांनी निदर्शनास आणून दिले आहे व सदरची रक्कम ही स्व पुरवठादार संस्थेला आहे. ज्यादा गेल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे प्रशासकीय राजवटीत हे चालले तरी काय असे म्हणण्याची वेळ आली असल्याची चर्चा आहे.
आरोग्य विभागात शौचालय देखभाल साहित्य खरेदीचे प्रकरणी मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व साहित्य पालिकेत असल्याचा खुलासा करत तरीही याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात येईल व मागील बिलांसंदर्भात चौकशी करण्यात येईल असे सांगितले.