चोपडा येथील शंतनू परमिट बारचा परवाना रद्द करण्याची मागणी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा येथील परमिट रूम ॲण्ड बार रेस्टारंटचा परवाना रद्द करण्यात यावा अशी, मागणीचे निवेदन राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चोपडा शहरातील गळ नदी तिरावर शंतनू परमिट रूम ॲण्ड बार रेस्टारंटने सुरू करण्यात आलेल्या हॉटेलात ग्राहकांसाठी नियमाप्रमाणे कोणत्याच सुविधा नाही. याठिकाणी ग्राहकांना बसण्याची व्यवस्था नाही, शौचालयाची व्यवस्था नाही, शौचालय नसल्याने ग्राहकांना नदीच्या तिरावर लघूशंकेसाठी जावे लागते, जेवणाची व्यवस्था नाही, वेटर नाही, तसेच फॅमिली रूम नाहीत. ग्राहकांसाठी कोणत्याच सुविधा नसतांना या हॉटेल व्यवसायिकाला बिअर बारचा परवाना देण्यात आला आहे.

दरम्यान  शासन नियमाप्रमाणे शंतनू रेस्टारंट परमिट बार ॲण्ड बिअरबार  सुरू असून त्याची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करणारे अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी आणि परमिट बार साठी दिलेला परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अन्यथा राज्य उत्पादन शुल्क कायालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा तक्रारदार यांनी केला आहे.  निवेदनावर प्रमोद इंगळे, जितेंद्र केदार, राहुल सुरवाडे, ललित घोगले, वैभव शिरतुरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!