Home क्राईम जळगावातून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले

जळगावातून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले

0
24


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीलत वेगवेगळ्या भागातून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, पहिल्या फिर्यादीनुसार १७ वर्षीय मुलगी रावेर तालुक्यातील रहिवाशी असून ती जळगाव येथे नातेवाईकांकडे राहण्यासाठी आली होती. १७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. मैत्रीण व नातेवाईकांकडे शोध घेवून माहिती न मिळाल्याने मुलीच्या वडीलांनी मंगळवारी १९ एप्रिल रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महीला पोलीस कॉन्स्टेबल उषा सोनवणे करीत आहे.

तर दुसऱ्या घटनेत, १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी १९ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता अज्ञात व्यक्तीने मुलगी घरी असतांना फूस लावून पळवून नेले. मुलीच्या पालकांनी तिचा शोधाशोध केली परंतू कुठेही आढळून न आल्याने पालकांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी १९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound