Home Cities जळगाव भविष्य निर्वाह निधीचे खाते उतारे संकेतस्थळावर उपलब्ध

भविष्य निर्वाह निधीचे खाते उतारे संकेतस्थळावर उपलब्ध

0
68

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे सन २०२०-२१ चे खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

 

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचे उतारे जिल्हापरिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांना १८ एप्रिल, २०२२ पासून http://zpjalgaon.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याची प्रिंटही काढता येणार आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सदर लेखे पूर्ण करण्यासाठी लेखाधिकारी दिलीप वानखेडे, कनिष्ठ लेखाधिकारी किरण पराशर व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. संबधित खाते उताऱ्यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास एक महिन्याच्या आत सबंधीत खाते प्रमुखा मार्फत अर्थ विभागाच्या भनिनि शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य लेखा वित्त अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound