Home आरोग्य फैजपूर येथील दत्त ड्रिपतर्फे पोलीस ठाण्यात कुलर व वाटर फिल्टर भेट

फैजपूर येथील दत्त ड्रिपतर्फे पोलीस ठाण्यात कुलर व वाटर फिल्टर भेट

0
37

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । फैजपूर पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि अभ्यागत यांना पिण्यासाठी वापरलेले फिल्टर आणि कुलर खराब झाले होते. याबाबत दत्त ड्रिप इरिगेशन फैजपूर संचालक युगंधर पवार यांना कळविल्यानंतर त्यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस ठाण्यात वॉटर फिल्टर व कुलर प्लांट बसविला.

फैजपुर पोलीस स्टेशन मधील स्टाफ व अभ्यागत यांना पिण्यासाठी वापरात असलेला फिल्टर व कूलर हे नादुरुस्त झालेले होते.ते दुरुस्त करणे शक्य नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. फैजपूर येथील दत्त ड्रिप इरिगेशनचे संचालक  युगंधर पवार यांना सदर बाबत कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ सदर बाबीस सकारात्मक प्रतिसाद देऊन पोलीस ठाण्यास वॉटर फिल्टर व कुलर प्लांट बसवून दिला. आज रोजी सदर प्लांट्स चे उद्घाटन  उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे  यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी दत्त ड्रिप चे संचालक युगंधर पवार हे देखील उपस्थित होते.


Protected Content

Play sound