Home Cities चाळीसगाव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

0
62

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने चाळीसगाव शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार, दि. १३ एप्रिल ते शुक्रवार, दि. १५ एप्रिल दरम्यान शहरात अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यात बुधवार, दि. १३ रोजी रात्री १२ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव सोहळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे संपन्न होईल.

गुरूवार, दि. १४ रोजी सकाळी ७ ते ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून भिमसंदेश मोटारसायकल रॅली निघेल तर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता सामूहिक बुद्धवंदना व अभिवादन कार्यक्रम संपन्न होईल. सायंकाळी ५ वाजता रेल्वे स्टेशन येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य मिरवणूक काढण्यात येईल.

आयोजित केलेल्या कार्यक्रमांतर्गत १४ आणि १५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवार, दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सुप्रसिद्ध गायक राजू बागुल व सुप्रसिद्ध गायिका निशा भगत यांचा भिम गीतांचा प्रबोधनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शहरात आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound