जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती व क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त योगेश पाटील, सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्यावतीने लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात महिला मेळावा घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविदयालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. राकेश चौधरी उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. डॉ. भारती गायकवाड यांनी महिला सक्षमीकरणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान याविषयावर मार्गदर्शन केले. तसेच महिला विषयक कायदयांची माहिती दिली. यावेळी प्रा.डॉ. कल्पना भांरबे यांनी महिला व अंधश्रध्दा याविषयावर आपले विचार मांडले. कार्यक्रमप्रसंगी समाज कल्याण निरीक्षक शोभा चौधरी, प्रा.डॉ योगेश महाजन, प्रा.डॉ. शाम सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ सुनिता चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन तालुका समन्वयक जितेंद्र धनगर तर सुत्रसंचालन रूचिता इंगळे यांनी केले.
यावेळी महाविदयालयाचे प्रा.डॉ निलेश चौधरी, समाज कल्याण विभागाचे जी डी बोरसे, तालुका समन्वयक चेतन चौधरी, शिला अडकमोल तसेच महाविदयालय व समाज कल्याण विभागाचे कर्मचारीवृंद यांनी कार्यक्रम यशस्वतेसाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मेळाव्यास महिला, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.