विद्यापीठात जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहे.

 

सोमवार ११ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी अभिजत राऊत, यांच्या हस्ते जयंती महोत्सव कार्यक्रमाचे उदघाटन होईल. कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी हे अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी ‘महात्मा फुले यांच्या विचार कार्याचा विविध समाज समूहावरील प्रभाव’ या विषयावर प्रसिध्द इतिहासकार श्रीमंत कोकाटे, पुणे यांचे व्याख्यान होईल. यावेळी प्रा. म.सु.पगारे लिखित ग्रंथाचे प्रकाशन होईल. मंगळवार दि.१२ रोजी सकाळी १०.३० वाजता ‘आंबेडकरवादी चळवळीचे विविध आयाम आणि आव्हाने’ या विषयावर आनंदराज आंबेडकर यांचे व्याख्यान होईल. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.प्रवीण मुंडे, जिल्हा पोलीस अधिक्षक,जळगाव यांची उपस्थित राहील. प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे अध्यक्षस्थानी राहतील. बुधवार दि.१३ रोजी सकाळी १०.३० वाजता रक्तदान शिबीर होणार असून कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन होईल. दुपारी २.३० वाजता ‘शाहीरी जलसा’ हा कार्यक्रम शाहीर धूरंधर, मुक्ताईनगर हे सादर करतील. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, प्रभारी कुलसचिव डॉ.के.एफ.पवार यांची प्रमुख उपस्थिती राहील. गुरुवार दि.१४ रोजी सकाळी ७.१५ वाजता मिरवणूकीस प्रारंभा होऊन ९.३० वाजता समारोप होईल. सकाळी १०.३० वाजता ‘पुरोगामी चळवळीच्या दृष्टीकोनातून विकसनशील भारत’ या विषयावर डॉ.अशोक राणा, यवतमाळ यांचे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी राहतील. अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ.के.एफ.पवार, समन्वयक डॉ.अनिल चिकाटे, डॉ. म.सु.पगारे, प्रा.डॉ.अनिल डोंगरे यांनी दिली.

Protected Content