Home क्राईम शिवकॉलनी चौकात चिकन विक्रेत्यांमध्ये वाद ; एकमेकांवर कोयत्याने वार

शिवकॉलनी चौकात चिकन विक्रेत्यांमध्ये वाद ; एकमेकांवर कोयत्याने वार

0
133

जळगाव, प्रतिनिधी ।  शहरातील शिव कॉलनी परिसरातील हॉटेल चिनार गार्डन समोर चिकन विक्री करणाऱ्या दोन्ही विक्रेत्यांमध्ये आज सकाळी वादातून झालेल्या हाणामारीत एकमेकांवर  वार  करून दोघे जखमी झाले आहे दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, शिव कॉलनी परिसरात हॉटेल चिनार गार्डन जवळ चिकन विक्रेते चिकन विक्रीसाठी स्टॉल मांडून बसतात. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास जळगाव चिकन सेंटर सद्दाम मेहमूद खाटीक (वय-27)रा.तंबापुरा आणि लालूभाऊ चिकन सेंटर चे इम्रान गमीर खाटीक विक्रेत्यांमध्ये वाद झाला.  वाद वाढल्याने दोघांनी शस्त्रे हातात घेतले आणि एकमेकांवर वार केले. या घटनेत सद्दाम खाटीकच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली आहे तर इम्रान खाटीकच्या हाताला दुखापत झाली आहे. दोघांना रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 


Protected Content

Play sound