लाईट सुरळीत करा, अन्यथा…! – नंदकिशोर महाजनांचा इशारा

सावदा तालुका रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । दोन दिवसापासून रात्रीची सावदा परिसरातील शेती फिडरची लाईट झिरो लोड खाली पुर्ण बंद करण्यात येते. याविरोधात आज रात्री बंद असलेली लाईट भरून द्यावी व लाईट सुरळित करावी अन्यथा महावितरणच्या सावदा कार्यालयावर शेतकरी येतील, अशा इशारा  जि.प.उपाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी दिला.

गेल्या दोन दिवसापासुन सावदा परिसरातील शेती फिडरची रात्रीची लाईट झिरो लोड खाली पुर्ण बंद करण्यात येत असल्याने आज सकाळी 7.30 वाजता जि.प.उपाध्यक्ष तथा भा.ज.पा.जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता जिल्हाचे अधिक्षक अभियंता यांनी पण लाईट देणे किवा बंद करणे माझ्या हातात नाही असे उडवा उडवीचे उत्तर दिले.

या विरोधात आज रात्री बंद असलेली लाईट भरून द्यावी व आज रात्री ची लाईट सुरळित द्यावी अन्यथा महावितरणच्या सावदा कार्यालया वर शेतकरी येतील असे ठणकावले . तरी परीसरातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की आज रात्रीचा शेती विजपुरवठा सुरळीत न मिळाल्यास उद्या दि.8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता महावितरण कार्यालय सावदा येथे परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

 

Protected Content