जळगाव, लाइव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – एसटी कर्मचाऱ्याना कामावर हजर करून घेण्याचे राज्य सरकार आणि महामंडळ प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. कर्मचाऱ्याना अजून प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे आदेश मिळालेले नाहीत, न्यायालयावर आमचा विश्वास असून कर्मचाऱ्याची बाजू मांडणारे ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी कामगारांनी हजर व्हावे असे सांगत नाहीत तोपर्यत आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहोत, असे जळगाव एसटी विभागातील कर्मचाऱ्यानी म्हटले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या पाच महिन्यापासून राज्य सरकारमध्ये विलीनीकरण तसेच अन्य च्या मागणीवर संप सुरु आहे, या संदर्भात राज्य सरकारने त्यांची भूमिका कोर्टात मांडली असून आज या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याच्या सुचना दिल्या आहे. कर्मचाऱ्याना कामावर हजर करून घेण्याचे आदेश राज्य सरकार आणि महामंडळ प्रशासनाला दिले आहेत. परंतू, आमच्यापर्यंत कोणाता अल्टीमेटम आलेला नाही. एसटीचं जोपर्यंत विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत न डगमगता आमचा लढा कायम राहिल, आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असल्याचे जळगाव विभागातील एसटी कर्मचाऱ्यानी म्हटले आहे. यावेळी विनोद पाटील, शैलेश नन्नवरे आदी कर्मचारी उपस्थित होते.