Home राजकीय सर्जिकल स्ट्राईक मोदींनी नव्हे भारतीय लष्कराने केलाय : राहुल गांधी

सर्जिकल स्ट्राईक मोदींनी नव्हे भारतीय लष्कराने केलाय : राहुल गांधी


Rahul Gandhi
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सर्जिकल स्टाईक, नोटाबंदी, राफेल घोटाळ्यावरुन काँग्रेस अध्यक्षराहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सर्जिकल स्ट्राईक नरेंद्र मोदींनी नव्हे तर, भारतीय लष्कराने केले आहे. नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईक आपल्या सरकारने केल्याचे सांगत लष्कराचा अपमान करत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत लावला आहे.

 

 

राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, ते घाबरतात. दबाव आला की नरेंद्र मोदी पळून जातात, असा त्यांचा स्वभाव आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. तसेच, 2 कोटी रोजगार देण्याचे भाजपाने खोटे आश्वासन दिले होते. परंतु ते पूर्ण केले नाही म्हणून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमचा मुख्य मुद्दा रोजगारीचा आहे. मोदी सरकारने केलेली नोटाबंदीची योजना फसली असून त्याला काँग्रेसची न्याय योजना उत्तर देणार आहे. न्याय योजनेद्वारे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound