Home Cities जळगाव जळगावात भगवान झुलेलाल जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन

जळगावात भगवान झुलेलाल जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन

0
37

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पूज्य चेट्री चंड्र अर्थात सिंधी दिवसानिमित्ताने भगवान झुलेलाल यांच्या भव्य शोभा यात्रेचे शनिवार २ मे रोजी आयोजन करण्यात आले आहे.

 

अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट द्वारा संचलित भगवान झुलेलाल उत्सव समितीच्या वतीने भगवान झुलेलाल यांची जयंतीनिमित्त शोभा यात्रा शनिवार २ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेस फुले मार्केट येथील मरिमाता मंदिरात दुपारी ४ वाजता पूजा अर्चना करून प्रारंभ होणार आहे. ही शोभा यात्रा शास्त्री टाॅवर, संत गोधडीवाला मार्केट चौक, शिवाजी रोड, कोंबडी बाजार मार्गाने बी. जे. मार्केट रस्त्याने भगवान झुलेलाल मंदिर, संत कंवरराम चौक, बाबा हरदासराम हाऊसिंग सोसायटी मार्गाने कंवर नगर (सिंधी कॉलनी) येथे पोहचेल या शोभायात्रेचे विसर्जन पूज्य सेवा मंडल येथे रात्री ९.३० वाजता होणार आहे. दरम्यान शनिवार दि. २ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेपासून सिंधी बांधवांचे व्यवसाय बंद राहणार आहेत असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.


Protected Content

Play sound