जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोरीच्या गुन्ह्यात अटकेतील आरोपीने भुसावळ शहर पोलीसांच्या हातावर तुरी देत पसार झाल्याची धक्कादायक घटना पाळधी जवळील जैर इरीगेशनजवळ घडली आहे.
राजू विक्रम खांडेलकर (वय-२०) रा. महालखेडा ता. मुक्ताईनगर असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
राजू खांडेकर यांच्यावर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. त्याला धुळे जिल्हा कारागृहात दाखल केले होत. दरम्यान या गुन्ह्यात राजू विक्रम खांडेकर याला ट्रान्सफर वॉरंट घेवून भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रशिद तडवी, पोलीस नाईक जाकीर मंसूरी व पोलीस नाईक विकास बाविस्कर यांनी बुधवार ३० मार्च रोजी ताब्यात घेवून भुसावळकडे रवाना झाले होते. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील जैन इरीगेशन कंपनी आल्यानंतर पोलिसांच्या हाताला झटका मारत आरोपीने चालत्या वाहनातून उडी टाकून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकाराने पोलीस कर्मचारी देखील भांबावले व त्यांनी काही अंतरापर्यंत आरोपीचा पाठलाग केला परंतू अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला. याप्रकरणी पोलिसांच्या तावडीतून आरोपी पसार झाल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.