Home क्राईम जुने भांडण उकरून काढत एकाला मारहाण

जुने भांडण उकरून काढत एकाला मारहाण

0
70


फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मागील जुने भांडण उकरून काढत तरुणाला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना फैजपूर शहरातील सुभाष चौकात घडली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, ‘शेख एजाज उर्फ गुड्डू अहमद शेख जाकीर (वय-२७) रा. फैजपूर ता. यावल हा आपल्या कुटुंबीयांच्या वास्तव्याला आहे. रविवारी २७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शेख एजाज हा शहरातील सुभाष चौकातील पान टपरीवर पान खाण्यासाठी उभा होता.

त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून शेख अल्तमश शेख युसुफ रा. सिंधी कॉलनी, फैजपूर याने शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली आणि हातातील लोखंडी रॉडने डाव्या हातावर मारून गंभीर दुखापत केली.

याप्रकरणी शेख एजाज यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शेख अल्तमश शेख युसुफ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र मोरे करीत आहे.


Protected Content

Play sound