Home Uncategorized पिडीत महिलेला न्याय द्या

पिडीत महिलेला न्याय द्या

0
37

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – धरणगाव येथील महिलेला शिवसेनेच्या राक्षसी प्रवृत्ती कार्यकर्त्यांनी मारहाण करीत विनयभंग केला. या घटनेचा तीव्र निषेध करीत पिडीत महिलेला न्याय मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपा जिल्हा महानगर महिला आघाडीतर्फे निवेदनाद्वारे दिला आहे.

धरणगाव येथील महिलेला मारहाण करणाऱ्या  शिवसेनाच्या असुरी प्रवृतीच्या व्यक्तीवर कठोरपणे कारवाई करण्यात येऊन पिडीत महिलेला न्याय देण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन पोलीस मुख्यालयात अतिरिक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना भाजपा जिल्हा महानगर महिला आघाडी तर्फे देण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा महानगर महिला आघाडी अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, महिला मोर्चा सरचिटणीस रेखा वर्मा, जिल्हा महानगर उपाध्यक्ष रेखा कुलकर्णी, वंदना पाटील, ज्योती निंभोरे, ज्योती राजपूत, सरोज पाठक, छाया सारस्वत, मीनाक्षी पाठक, ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षा रेखा पाटील, ज्योती तिवारी, ऋतुजा संत आदि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.


Protected Content

Play sound