जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुंबईतील जगात सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करत असते. या अंतर्गत मुंबईतील ताज हाँटेलमध्ये सामाजिक पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यात जामनेर तालुक्यातील कुंभारी बु. येथील प्रभाकर साळवे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल २०२२ चा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कँन्सरग्रस्त रुग्णासाठी मोफत सुविधा, भटके कुत्रे यांना झालेल्या विविध आजारावर, जंगलातील जखमी प्राण्यांवर उपचार, स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी जनजागृती, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न यासारखे समाजोपयोगी कार्य प्रभाकर साळवे हे करत असतात.
डाँ.भाटीया या़च्या मार्फत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गणेश व्यवहारे, जितेंन्द्र गडेकर, माजि सरपंच सुरतसिंग जोशी, कुंभारी बु. ग्रामपचायत यांच्यातर्फे साळवेंचे अभिनंदन करण्यात आले.