दिलासादायक : बुलढाणा जिल्हा कोरोनामुक्त

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | संपूर्ण जगाला वेढून बसलेल्या कोरोनाची पकड आता ढिली होत असून बुलढाणाने कोरोनामुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. आज जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह आढळला नसून भरती असणाऱ्या तथा ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा शून्य आहे.

मिळालेल्या या आनंदाच्या ब्रेकिंग नुसार आज 58 व्यांदा जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह शून्य आहेत. कालपर्यंत जे 3 सक्रिय रुग्ण होते त्यांना शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, कोव्हीड योद्धे, पत्रकार तसेच पोलीस यंत्रणेला आणि कोरोना नियमांचे पालन करणाऱ्या सर्वांना याचे श्रेय जाते. योगायोग म्हणजे जिल्ह्यात 29 मार्च रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. आता बरोबर 2 वर्षांनी आजच्या तारखेत 29 मार्च रोजी जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.

 

 

Protected Content