किनगाव खुर्द येथे घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचे दुर्लक्ष

यावल प्रातिनिधी । तालुक्यातील किनगाव खुर्द या ग्राम पंचायतीचा भोंगळ व दुर्लक्षीत कारभारामुळे नागरिक वैतागले आहेत. गावात सांडपाण्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातच पाऊस पडल्यामुळे डास निर्माण होत असून या दुर्गंधीमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या प्रश्नाकडे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

यावल तालुक्यातील किनगाव खुर्द या साडे 3 हजाराच्या वर लोकसंख्या असलेल्या गावाला किनगाव खुर्दमध्ये उघडया पाईप लाईनमुळे कोरोनाच्या काळात ग्रामस्थांचे आरोग्यास धोकात आले आहे. ग्रामपंचायत सर्वत्र घाणीचे साम्राज्य ग्रामपंचयातीच्या माध्यमातून मागील दिवसांपुर्वी शासनाच्या योजने अंतर्गत लाखो रुपयांचे निधी खर्च करून प्रभाग क्रमांक ३ मधील लोकवस्तीतील घाणीचे सांडपाणी गावाबाहेर काढण्याकरीता गावात स्वच्छता निर्माण योजनेव्दारे भुमीगत गटारी टाकण्यात आल्या असुन या गटारींच्या कामात आर्थिक व्यवहार झाल्याने संबधींत ठेकेदारांने सदरचे भुमीगत गटारींचे काम हे निकृष्ट प्रतिचे केल्यामुळे कमी खोलीच्या गटारीत वरवरच पाईपलाईन टाकल्याने दुर्गंधीच्या सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागावा. पाइपलाईन उघड्यावर पडल्याने रस्त्यांने जाणाऱ्या वाहनांमुळे सांडपाण्यासाठी असलेली पाईपलाईन फुटल्यास प्रभागातील सार्वजनिक रस्त्यावर दुर्गंधीचे व घाणीने  मिश्रीत सांडपाणी या पाईपलाईन द्वारे गावात झाल्यास घाणीच्या पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.

या निकृष्ट कामाची तात्काळ चौकशी करून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आर्थिक स्वार्थ साध्य करण्यासाठी चुकीची मार्गाने झालेल्या कामाची संबधीत पुनश्च दुरूस्ती करून ग्रामस्थांच्या आरोग्यास होणारा संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. 

 

Protected Content