गुढीपाडवा निमित्त विविध कार्यक्रम

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहराचे आराध्य दैवत तिरुपती श्री बालाजी महाराज मंदिरात गुढीपाडवा नववर्ष निमित्त छपन्न भोग नवैद्यसह महाप्रसाद व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री बालाजी संस्थान व व्यंकटेश बालाजी महाप्रसाद समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने पहिल्यांदाच घेण्यात येत असलेल्या या कार्यक्रमा ची रूपरेषा अशी 2 एप्रिल म्हणजेच मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सात ते दहा वाजता श्री बालाजी महाराजांचा अभिषेक, दुपारी बारा वाजता भोग आरती, बारा ते रात्री सात वाजेपर्यंत छपन्न भोग व श्रींचे दर्शन, रात्री सात वाजता शेजआरती त्यानंतर सात ते दहा सौ सुनंदा चौधरी जळगाव यांचा श्रीहरी भक्ती संगीत मंडळ यांचा सुमधुर वाणीतुन भक्ति गीतांचा कार्यक्रम होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 3 एप्रिल रविवार रोजी छपन्न भोग प्रसाद वाटप सकाळी आठ वाजेपासून सुरुवात होईल. या छपन्न भोग नवैद्य साठी ज्या भाविकांना सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी मोबाईल क्रमांक 9970803258, 7057847505, 9881580411, 94216 55201 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री बालाजी मंदिराचे मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी, व्यंकटेश बालाजी महाप्रसाद समिती अध्यक्ष माजी खासदार ए टी पाटील, व व्यंकटेश बालाजी महाप्रसाद समिती व संस्थानने केले आहे.

 

Protected Content