Home Uncategorized चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांना सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्काराने सन्मानित

चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांना सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्काराने सन्मानित


बुलडाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांना सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्कार केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याहस्ते दिल्ली येथे एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

 

सिक्स सिग्मा एक्सलन्स अवार्ड हा आशियातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. भारताचे पहिले माजी सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे हा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी लष्करप्रमुख मा. जनरल मनोज नरवणे या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

 

चिखलीच्या भाजपाच्या आमदार  सौ श्वेता महाले सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.  अत्यंत काटेकोर नामांकन प्रक्रिया, अंतर्गत व बाह्य अंकेक्षण, सखोल विश्लेषणाद्वारे सर्वोच्च ज्युरी मंडळाने कार्यकर्तृत्वाचे मूल्यांकन करून हा पुरस्कार जाहीर केला

 

हा नागरिकांचा सन्मान”- आ. श्वेता महाले

जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली . त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे. त्यांच्या अडीअडचणीत सुख दुःखात सहभागी होता आले / येत आहे हे माझे भाग्य आहे. असे मत आमदार श्वेताताई महाले यांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound