Home क्राईम धरणगाव तहसील कार्यालयातुन ट्रॅक्टर-ट्रॉली लंपास

धरणगाव तहसील कार्यालयातुन ट्रॅक्टर-ट्रॉली लंपास

0
117


धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारातील ट्रॅक्टर व ट्रॉली चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की तहसीलदार यांच्यातर्फे प्राधिकृत करण्यात आलेला आदेश गौणखनीज । काशी । 99 ‌ । 2022 दि. 16 मार्च 2022 नुसार तहसील कार्यालय धरणगाव आवारात लावलेलो 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे ट्रॅक्टर क्रमांक MH 19.BG.6071 व ट्रॉली अज्ञात व्यक्तीने चोरी करुन नेले हे ट्रॅक्सर व ट्रॉली बांभोरी येथील गिरणा नदीपात्रात वाळू चोरी करताना आढळून आले होते. त्यानंतर वाळू नदीपात्रात खाली करून नदी पात्रात ट्रॅक्टर व ट्रॉली तहसील कार्यालयात आणण्यात आले होते.

याप्रकरणी  तलाठी अलताब निझाम  पठाण  (वय ३३ या. अनिता नगर  धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन  पुढील तपास सहा फौ. योगेश जोशी करीत आहेत दरम्यान हे ट्रॅक्स ट्रॉली  चोरीटयाने चोरुन नेले की मुद्याम चोरी करु देण्यात आले. याबाबत गावात खंमग चर्चा सुरू आहे.

 


Protected Content

Play sound