जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उप अधिष्ठाता डॉ.मारोती पोटे, डॉ.अरुण कसोटे, डॉ.संदीप पटेल, किरण बावसकर, प्रदीप जयस्वाल, ज्ञानेश्वर राठोड, महेश गुंडाळे, अनंत बोबडे, संजय शेळके, लीलाधर कोळी यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.