जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्ह्यात आज दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळून आला नाही. तर २ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना ओसरत असल्याचे आलेख मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५३० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९३१ बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५९१रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे आता सध्या ८ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.