Home क्राईम पुण्याजवळ भीषण अपघात ; ५ जण जागीच ठार

पुण्याजवळ भीषण अपघात ; ५ जण जागीच ठार


pune chakan accident
 

चाकण (वृत्तसंस्था) चाकण-तळेगाव रस्त्यावर महाळुंगे येथे मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी आणि दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

 

 

आज मध्यरात्री ईरटीका कार व दोन वेगवेगळ्या दुचाकींचा अपघात झाला असून, या अपघातामध्ये दुचाकीवरील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात चंद्रशेखर सूरज विश्वकर्मा, सुनिल शर्मा, दिपनारायण विश्वकर्मा, सत्यवान पांडे , संजय विश्वकर्मा या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातावेळी एका दुचाकीवर तीन जण तर दुसऱ्या दुचाकीवर दोन असे पाच जण प्रवास करत होते. समोरुन येणार्‍या कारला जोरदार धडक लागल्याने हा भिषण अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound