आसोदा येथे महिलेसह मुलाला मारहाण; तालुका पोलीसात तक्रार

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाळलेली कबुतरे गावातील दुसर्‍या व्यक्तीकडे आले की नाही हे बघण्यासाठी गेलेल्या दोघांनी महिलेसह तिच्या मुलाला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना असोदा येथे घडली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध तालुका पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, असोदा येथील दिनेश रमेश कोळी व त्याचा मुलगा युवराज दिनेश कोळी यांनी कबुतरे पाळली आहे. त्यांची कबुतरे गावातील सबाना बी शेख सलीम (वय-४५) यांच्याकडे आली असल्याचा संशय आला होता. त्यानुसार ते कबुतरे पाहण्यासाठी गुरुवारी रात्री साठेवाजेच्या सुमारास गेले होते. याच कारणावरुन दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याने दोघ एकमेकांना समजवित असतांना दिनेश कोळी व त्यांचा मुलगा युवराज कोळी या दोघांनी सबाना बी शेख सलीम व त्यांचा मुलगा तौशीब शेख सलीम यांना शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सबाना बी शेख यांच्या ङ्गिर्यादीवरुन दोन जणांविरुद्ध तालुका पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास साहेबराव पाटील हे करीत आहे.

Protected Content