Home क्राईम चाळीसगावातून एकाची दुचाकी लांबविली

चाळीसगावातून एकाची दुचाकी लांबविली

0
36
bike thieves 20180259850
bike thieves 20180259850

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील परदेशी हॉस्पिटलसमोरून एकाची १२ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, महादू मोतीराम राठोड (वय-६०) रा. बोढरे ता. चाळीसगाव हे शेती काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २५ फेब्रुवारी रोजी ५ पाच वाजता चाळीसगाव शहरातील परदेशी हॉस्पिटल येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी आले. त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ जेडब्ल्यू ५८०३) हॉस्पिटलसमोर पार्क करून लावली. व नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजता घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना दुचाकी जागेवर आढळून आले नाही. यासंदर्भात त्यांनी दुचाकी परिसरात शोध घेतला मिळून आल्याने त्यांनी अखेर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुमन पाटील करीत आहेत.


Protected Content

Play sound