Home क्राईम दोन लाखासाठी विवाहितेचा छळ; अडावद पोलीसात गुन्हा दाखल

दोन लाखासाठी विवाहितेचा छळ; अडावद पोलीसात गुन्हा दाखल

0
102
mahila

चोपडा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । घर घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करण्याऱ्या पतीसह तीन जणांवर अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील वर्डा येथील माहेर असलेल्या वैशाली अंबादास धनगर (वय-२७) यांचा विवाह बदलापूर येथील अंबादास वसंत धनगर यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती अंबादास याने बदलापूर येथे घर घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये मिळावे अशी मागणी केली. पैश्यांची पुर्तता न केल्याने पती अंबादास याने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर विवाहितेला दामदाटी करून घरातून हाकलून लावले. त्यानंतर शुभांगी अंबादास धनगर या महिलेशी दुसरा संसार थाटला आहे. याप्रकरणी विवाहितेन अडावद पोलीस ठाण्यात धाव घेवून रितसर तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती अंबादास वसंत धनगर, सासू त्रिवेनाबाई वसंत धनगर आणि सवत शुभांगी अंबादास धनगर यांच्याविरोधात अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नासीर तडवी करीत आहे.


Protected Content

Play sound