जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अभ्यासाच्या तणावातून १४ वर्षीय प्रेम प्रवीण सोनवणे (रा. इंद्रप्रस्थ नगर) या विद्यार्थ्याने राहत्या घरात साडीने गळफस घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हा पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार विभागातील कर्मचारी प्रवीण सोनवणे हे पत्नी, मुलगा प्रेम सोनवणे, मुलगी व आईसोबत वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा प्रेम हा सेंट लॉरेन्स इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये नववीचे शिक्षण घेत होता. दरम्यान, गुरुवारी २४ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास प्रेम याने घरातील बेडरुममध्ये छताला साडीच्या सहाय्याने गळङ्गास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी प्रेमला खाली उतरवित त्याला परिसरातील नागरिकांनी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी केली असता, त्याला मयत घोषीत केले. याप्रकरणी प्रङ्गुल्ल पाटील यांच्या खबरीवरुन शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रेम हा शहरातील सेंट लॉरेन्स शाळेत इयत्ता नववीचे शिक्षण घेत होता. तो अभ्यासात प्रचंड हुशार असल्याने तो अधिक वेळ अभ्यासाठी देत होता. दरम्यान अभ्यासाच्या तणावातून त्याने गळफास घेतला. या घटनेमुळे त्याच्या आईवडीलांसह नातेवाईकांना मानसिक धक्का बसला आहे. चौदा वर्षीय विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावामुळे टोकाचे निर्णय घेत आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात शोककळा पसरली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान बहिण व आजी असा परिवार आहे.