Home Cities जळगाव म्हसावद ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगेबाबा यांना अभिवादन

म्हसावद ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगेबाबा यांना अभिवादन

0
35

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच गोविंद पवार यांच्याहस्ते संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच गोविंद पवार यांनी  समाजप्रबोधनकार, अस्तित्व दाखवणारे, माणसात देव शोधणारे असे संत गाडगेबाबा यांच्या कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आंबा चिंचोरे, पिंटू पाटील, उपसरपंच विकी चव्हाण, बापू धनगर, मोतीराम सर , पत्रकार दिपक महाजन यांच्यासह गावातील समाज बांधव, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound