Home Cities जळगाव पंतप्रधानांनी जळगावातील फोटो केला ट्विट : शिवरायांना वंदन !

पंतप्रधानांनी जळगावातील फोटो केला ट्विट : शिवरायांना वंदन !

0
38

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन करतांना शिवरायांना वंदन करतांनाचा जळगावातील सभेमधला फोटो ट्विट केला आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट करत अभिवादन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. सत्य आणि न्याय या मुल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

यातील लक्षणीय बाब म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी यासोबत शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत असतांनाचा फोटो देखील शेअर केला आहे. हा फोटो त्यांच्या जळगाव येथील सभेतील आहे. नरेंद्र मोदी यांची जळगाव येथे सभा झाली असतांनाचा हा फोटो असून यात माजी खासदार स्व. हरीभाऊ जावळे, अशोक कांडेलकर आणि डॉ. गुरूमुख जगवाणी हे देखील दिसत आहेत. सोशल मीडियात याची एकच चर्चा सुरू आहे.


Protected Content

Play sound